|| संदीप आचार्य

सव्वा कोटी कुप्यांसाठी राज्याचे पत्र

Tata Hospital to start super specialty hospital for cancer
कर्करोग रुग्णांसाठी टाटा रुग्णालय सुरू करणार अतिविशेषोपचार रुग्णालय
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
No bird flu death reported in Dhule but 27 Rapid Response Teams activated precaution
धुळ्यात ‘बर्ड फ्लू’ प्रादूर्भावापूर्वीच २७ पथके तैनात, कुक्कुट व्यावसायिकांना सूचना
Hair , bald , Buldhana, Ayurveda, Homeopathy ,
बुलढाण्यात टक्कल पडलेल्यांना पुन्हा केस; ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथीसह…
22 health care centers closed due to local opposition have to find new location
स्थानिकांच्या विरोधामुळे २२ आरोग्यवर्धिनी केंद्र अधांतरी, नवीन जागा शोधण्याची वेळ
Nutritionist shares 5 tips to follow for good gut health know Experts opinion
“रोज आवळा खा अन् ताक प्या अन् आतड्यांचे आरोग्य सुधारा; आहारतज्ज्ञांनी सांगितलेले हे ५ खरंच उपयुक्त आहेत का?
Guillain Barre syndrome, contaminated water,
दूषित पाणी अथवा अन्नामुळे गुइलेन बॅरे सिंड्रोम! काळजी काय घ्यावी जाणून घ्या…
Heart disease risk , non vegetarian , health care,
हृदयरोगाचा धोका कमी करायचाय? मग, मांसाहार करणाऱ्यांनी…

मुंबई : गंभीर ते अतिगंभीरतेकडे वाटचाल करणारे करोना रुग्ण तसेच म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजारांच्या रुग्णांसाठी सध्या जीवरक्षक इंजेक्शनचा तुटवडा राज्याच्या वेगवेगळ्या भागात जाणवत आहे. आगामी काळात यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची भीती व्यक्त करून यासाठी अत्यावश्यक असलेल्या तीन जीवरक्षक इंजेक्शनचे सव्वा कोटी डोस महाराष्ट्राला तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी, अशी विनंती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

महाराष्ट्रातील एकूण उपचाराधीन रुग्ण तसेच त्यातील अतिदक्षता विभागात ऑक्सिजन, रेमडेसिविर तसेच स्टिरॉईडच्या उपचारांखाली असलेल्या रुग्णांना प्रामुख्याने मिथाईल प्रेडनिसॉल, लो-मॉल्युक्युलर वेट हेपरिन आणि अ‍ॅम्फोथ्रिसिन या इंजेक्शनची आवश्यकता असते. गेल्या काही दिवसांपासून ही तिन्ही इंजेक्शन राज्यातील काही भागांत रुग्णांना मिळत नसल्यामुळे करोना रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आगामी दोन आठवडे ही परिस्थिती अशीच राहिली तर राज्यातील अनेक रुग्णांचे जीव धोक्यात येऊ शकतात, अशी भीती कुंटे यांनी केंद्रीय औषधी द्रव्ये, खते व रसायने विभागाच्या सचिव एस. अपर्णा यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

मिथाईल प्रेडनिसॉल व लो मॉल्युक्युलर वेट हेपरिन हे ऑक्सिजन व रेमडेसिविर उपचारांवरील रुग्णांसाठी आवश्यक आहे. यातील मिथाईल प्रेडनसॉल हे रेमडेसिविरसोबत द्यावयाचे स्टिरॉइड आहे तर हेपरीन हे रक्तातील गुठळी नष्ट करण्यासाठी वापरले जाते. एका रुग्णाला साधारणपणे २० कुपी लागत असून प्रेडनिसॉलची रोजची गरज ७० हजार कुपींची असून नव्वद दिवसांसाठी सहा लाख ३० हजार कुपी लागणार आहेत तर मॉल्युक्युलर हेपरिनची रोजची गरज एक लाख ४० हजार कुपी एवढी असून नव्वद दिवसांसाठी एक कोटी २६ लाख कुपी लागतील, असे मुख्य सचिवांनी पत्रात नमूद केले आहे.

या पत्रात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला असून म्युकरमायकोसिसचा फैलाव रोखण्यासाठी अ‍ॅम्फोथ्रीसिन या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात गरज लागणार असल्याचे कुंटे यांनी स्पष्ट केले आहे. या बुरशीजन्य आजारात रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याबरोबरच नाकावाटे यात बुरशी शरीरात प्रवेश करते. ही बुरशी डोळ्यातील पेशी व मेंदूतही प्रवेश करते. यात अनेकांना अंधत्व आले असून या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त वाढू शकते. यावर अ‍ॅम्फोथ्रीसिन बी प्लेन याच्या १४ कुपी देणे गरजेचे असून राज्यातील अनेक भागांत आज हे इंजेक्शन उपलब्ध नाही.

अ‍ॅम्फोथ्रीसिनच्या एक लाख ३८ हजार ६०० कुपींची आवश्यकता असून या तिन्ही औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्यांचे उत्पादन वाढविण्यास सांगावे तसेच महाराष्ट्राला जास्तीत जास्त इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी, अशी विनंती मुख्य सचिवांनी आपल्या पत्रात केली आहे.

Story img Loader