पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी स्थानकात सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चर्चगेट, तसेच विरारच्या  दिशेने जाणाऱ्या जलद लोकल विलंबाने धावत आहेत. मध्य रेल्वेवरील धीम्या आणि जलदलोकल सेवेचा ऐन गर्दीच्या वेळी बोजवारा उडाला असून लोकल रद्द होत असल्याची उदघोषणा काही स्थानकांत करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकाळी साधारण आठ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास अंधेरी स्थानकात अप आणि डाउन जलद मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे या मार्गांवरील जलद लोकल गाड्यांचा वेग मंदावला. काही जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे धीम्या आणि जलद अशा दोन्ही लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होऊन लोकल उशिराने धावू लागल्या. काही लोकल विरार, बोरिवली, अंधेरी स्थानकाजवळ थांबून राहिल्या. परिणामी सकाळी कामावर जाणाऱ्याना त्याचा फटका बसला. दरम्यान, सकाळी सव्वा नऊ वाजता म्हणजे पाऊण तासाने दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मात्र त्याचा परिणाम अद्यापही लोकल सेवेवर होत आहे. मध्य रेल्वेवरीलही सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या जलद तसेच धीम्या लोकल दहा ते पंधरा मिनिटे विलंबाने धावत आहेत. मात्र  त्यामागील नेमके कारण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central and western local trains running late due to technical problems in signal system mumbai print news zws