तब्बल ६३ तासांच्या मेगाब्लॉकमध्ये अवघ्या मुंबईकरांचा घामटा निघाल्यानंतर सोमवारी तरी वेळेत आणि आरामात कार्यालयत पोहोचू या आशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरलं आहे. कारण, आज सकाळपासूनच मध्य आणि पश्चिम रेल्वे खोळंबली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच लेटलतिफ झाल्याने सामान्य नोकरदारवर्गाने नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि ठाणे स्थानकांतील अत्यावश्यक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. यासाठी ठाण्याच्या फलाट क्रमांक ५-६ चे रुंदीकरण आणि सीएसएमटी येथे फलाट क्रमांक १०-११ चे नॉन-इंटरलॉकिंग काम सुरू आहे. त्यामुळे ठाण्यात ६३ तास आणि सीएसएमटी येथे ३६ तासांचा ब्लाॅक घेण्यात आला होता. या ब्लाॅककाळात नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प मध्य रेल्वेने सोडला असून त्यादृष्टीने युद्धपातळीवर कामे केली. या कामांसाठी ६३ तासांचा मेगाब्लॉक घेऊन सामान्य मुंबईकरांना जेरीस धरलं होतं. परंतु, सोमवारपासून तरी वेळेत कार्यालयात पोहोचू या आशेवरही पाणी फेरलं गेलंय. कारण आज सकाळपासूनच मध्य रेल्वे तब्बल अर्धा तास ते पाऊण तास उशिराने धावत आहेत.

Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
BEST employees and passengers protest
बेस्ट कर्मचारी, प्रवाशांचे निषेध आंदोलन
Manisha Khatri as Commissioner of Nashik Municipal Corporation
नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे बदलीनाट्य, आता मनिषा खत्री यांची नियुक्ती
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
bandra Nirmal Nagar mhada
वांद्रे, निर्मलनगरमधील म्हाडा संक्रमण शिबिरार्थी रस्त्यावर, निर्मलनगरमध्येच घरे देण्याची मागणी

हेही वाचा >> जम्बोब्लॉक संपुष्टात; फलाट क्रमांक १०, ११ वरून २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या धावणार

पश्चिम रेल्वेही खोळंबली

पश्चिम रेल्वेवरही हीच संथ अवस्था आहे. बोरिवली रेल्वे स्थानकावर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे खोळंबली आहे. यामुळे बोरिवली रेल्वे स्थानकातील फला क्रमांक १ आणि २ वरील सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तांत्रिक बिघाड दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.तसंच, विरारहून सुटणाऱ्या ट्रेनही उशिराने धावत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

वक्तशीरपणा नाहीच

सीएसएमटीच्या फलाट १०-११चे विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतरही लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांना होणाऱ्या विलंबामध्ये सुधारणा होणार नाही. २४ डब्यांची रेल्वेगाडी उभी राहील, एवढ्या लांबीचे फलाट तयार केले जात आहेत. त्यामुळे सीएसएमटीवरून सुटणाऱ्या १२ ते १८ डब्यांच्या गाडीला अधिकच्या ६ ते १२ डब्यांची जोड होईल. मात्र इतर फलाटांचे विस्तारीकरण बाकी असल्याने, सध्यातरी रेल्वेगाड्यांना उशीर होणारच आहे. दरम्यान, सीएसएमटी येथे लांब पल्ल्याच्या गाड्यांना वळण घेऊन दाखल व्हावे लागत होते. फलाटांचे काम झाल्याने वळण वाचणार असले तरी त्यामुळे विलंबावर फारसा परिणाम होण्याची सध्यातरी शक्यता नाही.

Story img Loader