मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या शिवडी ते न्हावाशेवा व पुढे चिर्लेपर्यंत जाणाऱ्या २२ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतू प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी १९२० कोटी रुपयांच्या व्यवहार्यता तफावत निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच पुलाच्या कामासाठी निविदा मागवण्यात येतील आणि वर्षअखेपर्यंत सागरी सेतूचे बांधकाम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
हा २२ किलोमीटर लांबीचा सागरी सेतू प्रकल्प शिवडीपासून सुरू होईल व न्हावाशेवा येथे उतरल्यावर पुढे चिर्लेमार्गे राष्ट्रीय महामार्ग ४-बीला जोडला जाईल. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी ९,६३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी २० टक्के व्यवहार्यता तफावत निधी देण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे होता. पी. चिदम्बरम यांची त्याबाबतच्या फाइलवर स्वाक्षरी झाल्यानंतर शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाने हा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास कळवला.
या प्रकल्पासाठी इच्छुक कंपन्यांकडून विनंती प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्या प्रक्रियेत ‘मे. सिंट्रा-सोमा-एसआरईआय’, ‘मे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर-हुंदाई’, ‘मे. जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर-एल अँड टी-सॅमसंग सी अँड टी’, ‘मे. टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि.-ऑटोस्ट्रॅड इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर-व्हिन्सी कन्सेशन्स’, ‘मे. गॅमन इन्फ्रास्ट्रक्चर-ओएचएल कन्सेशन्स-जीएस इंजिनीअरिंग’ या पाच समूहांची निवड झाली होती. आता त्यांच्याकडून निविदा मागवून यशस्वी समूहाला बांधकामाचे कंत्राट मिळेल.

शिवडीजवळ ध्वनिप्रदूषणरोधक यंत्रणा
या सागरी सेतूमुळे शिवडी खाडीतील फ्लेमिंगो पक्ष्यांना त्रास होऊ नये यासाठी तेथे ध्वनिप्रदूषण रोखणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या पुलावरून भाभा अणुसंशोधन केंद्र दिसू नये यासाठी त्या पट्टय़ात अडथळे (व्हिज्युअल बॅरियर) उभे करण्यात येणार आहेत, असे प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल अस्थाना यांनी सांगितले.
central government grant fund of rs 1920 crore for  mumbai trans harbour link bridge
mumbai trans harbour link bridge, central government
शिवडी-न्हावाशेवा सेतूसाठी १९२० कोटी रुपये मंजूर
प्रस्तावावर केंद्रीय अर्थमंत्र्यांची स्वाक्षरी
प्रतिनिधी, मुंबई<br />मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या शिवडी ते न्हावाशेवा व पुढे चिर्लेपर्यंत जाणाऱ्या २२ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतू प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी १९२० कोटी रुपयांच्या व्यवहार्यता तफावत निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच पुलाच्या कामासाठी निविदा मागवण्यात येतील आणि वर्षअखेपर्यंत सागरी सेतूचे बांधकाम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
हा २२ किलोमीटर लांबीचा सागरी सेतू प्रकल्प शिवडीपासून सुरू होईल व न्हावाशेवा येथे उतरल्यावर पुढे चिर्लेमार्गे राष्ट्रीय महामार्ग ४-बीला जोडला जाईल. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी ९,६३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी २० टक्के व्यवहार्यता तफावत निधी देण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे होता. पी. चिदम्बरम यांची त्याबाबतच्या फाइलवर स्वाक्षरी झाल्यानंतर शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाने हा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास कळवला.
या प्रकल्पासाठी इच्छुक कंपन्यांकडून विनंती प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्या प्रक्रियेत ‘मे. सिंट्रा-सोमा-एसआरईआय’, ‘मे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर-हुंदाई’, ‘मे. जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर-एल अँड टी-सॅमसंग सी अँड टी’, ‘मे. टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि.-ऑटोस्ट्रॅड इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर-व्हिन्सी कन्सेशन्स’, ‘मे. गॅमन इन्फ्रास्ट्रक्चर-ओएचएल कन्सेशन्स-जीएस इंजिनीअरिंग’ या पाच समूहांची निवड झाली होती. आता त्यांच्याकडून निविदा मागवून यशस्वी समूहाला बांधकामाचे कंत्राट मिळेल.

शिवडीजवळ ध्वनिप्रदूषणरोधक यंत्रणा
या सागरी सेतूमुळे शिवडी खाडीतील फ्लेमिंगो पक्ष्यांना त्रास होऊ नये यासाठी तेथे ध्वनिप्रदूषण रोखणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या पुलावरून भाभा अणुसंशोधन केंद्र दिसू नये यासाठी त्या पट्टय़ात अडथळे (व्हिज्युअल बॅरियर) उभे करण्यात येणार आहेत, असे प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल अस्थाना यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात सागरी सेतू प्रकल्प
* २७ मीटर रुंद, सहापदरी रस्ता, तीन मार्गिका
* दक्षिण मुंबईहून घाटकोपपर्यंत जाणारा पूर्वमुक्त, मुक्त मार्ग प्रकल्प
* वरळी ते शिवडी हा ४.२५ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग प्रकल्प
* बांधकाम २०१८ अखेपर्यंत अपेक्षित
* चारचाकी वाहनांसाठी २२० रुपये टोल गृहीत
* रोज ६२ हजार वाहनांची वाहतूक पुलावरून अपेक्षित
* वाहनांमध्ये दरवर्षी पाच टक्के वाढ गृहित

Story img Loader