मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान तर हार्बर रेल्वेवर मानखुर्द आणि नेरूळ दरम्यान रविवारी अभियांत्रिकी कामानिमित्त साडेचार तसांचा मेगा ब्लॉक आहे. या काळात उनपगरी वाहतूक १५ मिनिटे विलंबाने सुरू राहणार असल्याचे मध्य रेल्वेने अधिकृतपणे कळविले आहे.
सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३४ पर्यंत मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात येणार असून माटुंग्याहून ठाण्याकडे जाणाऱ्या गाडय़ा विद्याविहार, कांजुरमार्ग आणि नाहूर या स्थानकांवर थांबणार नाहीत. या स्थानकांवर उतरू इच्छिणाऱ्या प्रवाशांनी पुढील स्थानकावर उतरून मागे येण्याची परवानगी देण्यात आली आहे. हार्बर मार्गावर मानखुर्द आणि नेरूळ स्थानकादरम्यान सकाळी १०.१२ ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत दोन्ही दिशेने ब्लॉक करण्यात येणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मानखुर्द आणि ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल-ठाणे दरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.

Story img Loader