उपनगरी रेल्वे मार्गावरील अभियांत्रिकी कामानिमित्त मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवार, २४ मार्च रोजी मेगा-जम्बो ब्लॉक करण्यात येणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर पाच तासांचा, तर हार्बर मार्गावर चार तासांचा ब्लॉक करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे मुलुंड ते कल्याण दरम्यानची धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. त्यामुळे गाडय़ा ठाणे आणि डोंबिवली या स्थानकांवर थांबणार असून प्रवाशांनी डोंबिवली आणि कल्याण स्थानकावर उतरून परतीचा प्रवास करावा, असे सूत्रांनी सांगितले. कल्याणच्या दिशेने जलद मार्गावरील गाडय़ांना त्यांच्या नियमित थांब्याव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड तर सीएसटीकडे येणाऱ्या गाडय़ांना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला येथे विशेष थांबे देण्यात आले आहेत.
हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्ला दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० या काळात मेगा ब्लॉक करण्यात येणार असून पनवेलकडे जाणाऱ्या गाडय़ा मेन लाईनने कुल्र्यापर्यंत जातील. वडाळा रोड ते वांद्रे दरम्यानची दोन्ही दिशेची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना रविवारी सकाळी १० ते सायंकाळी पाच या काळामध्ये मेन लाइन तसेच पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ याकाळात सांताक्रूझ आणि गोरेगावर दरम्यान धीम्या मार्गावर दोन्ही दिशेने जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली आहे.
शनिवार-रविवारी मध्यरात्री २.२० ते ३.५० या काळामध्ये सीएसटीकडे येणारी सर्व उपनगरी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे पनवेलहून शनिवार आणि रविवारी रात्री ११.४४ वाजता सीएसटीसाठी सुटणारी गाडी, तसेच सीएसटीहून रविवार आणि सोमवारी पहाटे ४.२३ वाजता पनवेलसाठी सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. कर्जतहून रात्री १०.४५ ची गाडी ठाण्यापर्यंतच असेल.
मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
उपनगरी रेल्वे मार्गावरील अभियांत्रिकी कामानिमित्त मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवार, २४ मार्च रोजी मेगा-जम्बो ब्लॉक करण्यात येणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर पाच तासांचा, तर हार्बर मार्गावर चार तासांचा ब्लॉक करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत ब्लॉक करण्यात येणार आहे.
First published on: 23-03-2013 at 02:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central harbour western observe mega block on sunday