देशाच्या विकासात आणि संपूर्ण देशाला जोडण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं योगदान मोठं आहे. देशाला उत्तम रस्ते, महामार्ग, वाहतुकीसाठी उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा द्यायचा नितीन गडकरी यांनी कायम प्रयत्न केला. नुकतीच त्यांनी एका यूट्यूब पॉडकास्टमध्ये हजेरी लावली आणि अशा बऱ्याच गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

राज शमानी या प्रसिद्ध यूट्यूबरच्या ‘पॉडकास्ट शो’मध्ये नुकतीच नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राजकारण, देशाचा आर्थिक आणि सर्वांगीण विकास, त्यांच्या खासगी आयुष्यातील किस्से, देशाचे नेतृत्व आणि त्यांच्या स्वप्नातील भारत या विषयांबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. याच मुलाखतीमध्ये त्यांना मुंबईच्या खड्ड्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
bjp leader and mlc yogesh tilekar uncle satish wagh killed after kidnapped in pune
भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून खून
padsaad reders reactions
पडसाद: अबू यांची चित्रशैली उलगडली
attack on police Nagpur, Nagpur, police Panchnama Nagpur,
हे काय चाललेय नागपुरात? पंचनामा करायला गेलेल्या पोलिसावरच हल्ला….
Baba Siddiqui murder case Lawrence Bishnoi gang key goon suspected of involvement Mumbai news
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण: लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या महत्त्वाच्या गुंडाचा सहभागाचा संशय
Ravi Rana on Chief Minister
Ravi Rana : “जिसकी हिस्सेदारी….”, एकनाथ शिंदेंचे नाव घेत रवी राणांनी सांगितले मुख्यमंंत्रीपदाचे गणित

आणखी वाचा : मुंबई: जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णांचे हाल

मुंबईचे खड्डे नेमके कधी भरून निघणार, या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी फार विस्तृत समर्पक असं उत्तर दिलं आणि त्यांच्या नियोजनाबद्दल त्यांनी खुलासा केला. नितीन गडकरी म्हणाले, “मुंबईत आम्ही जवळजवळ ५५ उड्डाणपूल बांधले. वरळी-वांद्रे सी-लिंक आम्ही बांधला, मुंबई-पुणे हायवे बांधला. मी मुंबई महानगरपालिकेशी याबाबत बोललो आहे. नुकताच मी मुंबईचे कमिशनर इक्बाल सिंग चहल यांना बेस्टच्या एका कार्यक्रमात भेटलो. त्या वेळी मी त्यांना एक सल्ला दिला की ६ किंवा ८ इंचांचं सिमेंट काँक्रीटीकरण करून घ्या. त्यांनी ६००० कोटी रुपयांचा हा कार्यक्रम हाती घेतला आहे आणि पूर्ण मुंबईत ते हे काम करणार आहेत.”

याच मुद्द्याला धरून नितीन गडकरी यांनी मुंबईत पावसाळ्यात पाणी भरण्याच्या समस्येवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “खासकरून जेव्हा समुद्रातील पाण्याची पातळी वाढते तेव्हा मुंबईत समुद्रातील पाणी आत शिरतं त्यासाठी एक खास ड्रेनेज सिस्टीम तयार करायला हवी. यापैकी रस्त्यांचं काँक्रीटीकरणाचं काम लवकरच पूर्ण होईल. आपल्याला बदलत्या वेळेनुसार आणि तंत्रज्ञानानुसार काम करणं आवश्यक आहे.”

Story img Loader