मुंबई : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने विदेशी पाळीव वन्यजीवांचा ताबा व त्यांच्या प्रजननासंबंधीचे नियम अधिसूचित केले आहेत. ‘वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२’च्या कलम ४९ एम अंतर्गत हे नियम तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार ‘वन्यजीव संरक्षण कायद्या’च्या श्रेणी ४ मध्ये ‘सायटीस’अंतर्गत संरक्षित करण्यात आलेले प्राणी जर पाळले जात असतील. तर त्यांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 ‘वन्यजीव संरक्षण कायद्या’मध्ये २०२३ साली सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार ‘सायटीस’अंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षित करण्यात आलेल्या विदेशी वन्यजीवांचा समावेश हा कायद्याच्या श्रेणी ४ मध्ये करण्यात आला. संयुक्त राष्ट्राच्या ‘आययूसीएन’ या परिषदेने १९६३ साली ‘सायटीस’ची स्थापना केली. १९७३ साली भारतासह ८० देशांनी ‘सायटीस’चे वन्यजीवांच्या तस्करीसंदर्भात नियम मान्य करून या परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले. दरम्यान, सायटीसच्या नियमानुसार कोणत्याही संकटग्रस्त विदेशी प्राण्याची तस्करी बंधनकारक आहे. त्यासाठी ‘सायटीसी’मध्येही विविध श्रेणी तयार करण्यात आल्या असून त्यातील प्रथम श्रेणीत संकटग्रस्त विदेशी वन्यजीवांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> महायुतीची दिल्लीतील बैठक रद्द; जागावाटपाचा तिढा कायम

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ‘लिव्हिंग अ‍ॅनिमल स्पिसीज (रिपोर्टिग अ‍ॅण्ड रजिस्ट्रेशन) रुल,’ २०२४ हा नियम अधिसूचित केला आहे. नव्या नियमानुसार भारतातील ज्या व्यक्तीने अथवा संस्थेने ‘सायटीस’च्या प्रथम श्रेणीत संरक्षित असलेले विदेशी प्राणी पाळले असतील, तर त्यांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. २८ फेब्रुवारी, २०२४ पासून पुढील ६ महिन्यांमध्ये ही नोंदणी करणे अनिवार्य आहे. परिवेश २.० पोर्टलद्वारे ही नोंदणी करता येतील. त्यानंतर पुढील ३० दिवसांच्या आत परिवेश पोर्टलच्या माध्यमातूनच संबंधित राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनादेखील माहिती देणे बंधनकारक असणार आहे. तसेच या विदेशी वन्यजीवांचे हस्तांतरण, त्यांना पिल्ले झाल्यास अथवा मृत्यू झाल्यास, त्याचीही नोंद परिवेश पोर्टलमध्ये करणे अनिवार्य असणार आहे. या नव्या नियमामुळे विदेशी प्राण्यांचे हस्तांतरण व जन्म-मृत्यू यांची नोंद ठेवता येणार आहे.

हेही वाचा >>> राहुल गांधी यांच्या यात्रेचे आज महाराष्ट्रात आगमन; प्रदेश काँग्रेसची जय्यत तयारी; मुंबईतील सभेसाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण

करण पोपट, कासव जप्त

मुंबई : मालेगावमधून क्रॉफर्ड मार्केटमध्ये नेण्यात येणारे ४८ करण पोपट आणि सात कासवांची तस्करी करणारे दोन ट्रक ठाणे वन विभागाने भिवंडीतील पडघे येथे पकडले. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये दोन चालक, दोन सहाय्यक चालक आणि दोन पोपट मागविणाऱ्यांचा समावेश आहे. वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यूडब्ल्यूए), पडघा रेंज वन अधिकाऱ्यांना याप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी ट्रक अडवून पोपट आणि कासवांची सुटका केली. तपासादरम्यान मालेगाव येथून पोपट व कासवांची तस्करी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. मालेगावमधून या प्रजातींची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे, असे ठाणे जिल्ह्याचे वनपाल रोहित मोहिते यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central new rule requires registration of exotic pets zws