मुंबई : मध्य रेल्वे उन्हाळ्याची सुट्टी आणि निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना जाता यावे यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवाशांच्या मागणीला आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दादर -गोरखपूर, एलटीटी – गोरखपूर आणि सीएसएमटी – दानापूरदरम्यान १२ अतिरिक्त अनारक्षित उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक ०१०१५ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी २७ एप्रिल, १ मे आणि ४ मे रोजी दादर येथून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०१६ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी गोरखपूर येथून २९ एप्रिल, ३ मे आणि ६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता दादर येथे पोहोचेल.
हेही वाचा : महाकाय तुळई समुद्रात स्थापन, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी यशस्वी
गाडी क्रमांक ०१४२७ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी २६ एप्रिल, १ मे रोजी रात्री ११.५० वाजता एलटीटीवरून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४२८ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी २८ एप्रिल, ३ मे रोजी गोरखपूरवरून दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता पोहोचेल.
हेही वाचा : राज्यात हिवताप रुग्णांच्या मृत्यूमध्ये घट
गाडी क्रमांक ०१०५१ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी २८ एप्रिल रोजी सीएसएमटी येथून रात्री ११.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता दानापूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०५२ अनारक्षित विशेष गाडी रेल्वेगाडी ३० एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता दानापूर येथून सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.