कुलदीप घायवट

मुंबई : रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन गर्दीच्या स्थानकांतील फलाटांवरील स्टॉल हटविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य रेल्वेवर रोज ४० लाखांहून अधिक जण प्रवास करतात. सर्वाधिक प्रवासी सीएसएमटी स्थानकातील आहेत. त्यानंतर ठाणे, कल्याण, घाटकोपर, डोंबिवली, कुर्ला, पनवेल आणि दादर येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.उपनगरी रेल्वे गाडय़ांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास फलाटांवर मोठी गर्दी होते. त्यात फलाटांवरील स्टॉलचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ते हटवण्यासाठी नियोजन प्रशासन करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mumbai central railway block loksatta news
मुंबई: मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
IRCTC Refund Policy check how much refund will be given on canelled tickets of trains
IRCTC Refund Policy: ट्रेनची तिकीट रद्द केल्यावर किती ‘रिफंड’ मिळतो? जाणून घ्या सविस्तर
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
restrictions on sale of railway platform tickets lifted from 9 november
Railway Platform Tickets Available : फलाट तिकीट पुन्हा उपलब्ध

काही दिवसांपूर्वी ठाणे स्थानकातील गर्दीची एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. मध्य रेल्वेवरील इतर गर्दीच्या स्थानकांतही अशीच स्थिती आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांना फलाटावर पाऊल ठेवण्यासही जागा नसते. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी स्टॉल हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. गर्दीच्या स्थानकांवरील स्टॉल हटवण्याबाबत नियोजन सुरू आहे. मात्र यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका : उमेदवारांच्या बेकायदा बांधकामांची माहिती जनतेला कळणार

दादर स्थानकात फलाट क्रमांक ३ व ४ वर चार स्टॉल आहेत. या स्टॉलमुळे फलाटाची जागा व्यापलेली आहे. तसेच स्टॉलच्या आवारात गर्दी होत असल्याने प्रवाशांना अडचण होते. याशिवाय कुर्ला, ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांतील स्टॉलने फलाटांची जागा व्यापली आहे. 

४०० हून अधिक स्टॉल मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात

८१ स्टॉल सीएसएमटी-कल्याणदरम्यान