मुंबई : मध्य रेल्वेवरील कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी विशेष रेल्वे वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवार – रविवारी रात्रकालीन आणि रविवार – सोमवारी रात्रकालीन ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे सीएसएमटी – भायखळा आणि सीएसएमटी – वडाळा रोड लोकल सेवा उपलब्ध होणार नाही. तसेच इतर लोकल, रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कर्नाक बंदर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा – सीएसएमटी आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड – सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा रद्द केली आहे. तसेच मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील लोकल भायखळा, परळ, ठाणे आणि कल्याणपर्यंत चालवण्यात येणार आहेत. तसेच या स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने धावतील. तर, हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल वडाळा रोड स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. तसेच या स्थानकातून लोकल पनवेलला जातील.

ब्लाॅकचा पहिला दिवस

कधी : शनिवारी रात्री १२ ते रविवारी सकाळी ६ वाजता (६ तासांचा ब्लाॅक)

कुठे : भायखळा – सीएसएमटी अप आणि डाऊन धीमी, जलद मार्गावर. वडाळा रोड – सीएसएमटी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

मुख्य मार्गावर

– ब्लाॅकपूर्वी रात्री ११.४२ वाजता शेवटची सीएसएमटी – टिटवाळा लोकल असेल.

– सीएसएमटीहून डाऊन जलद मार्गावरील शेवटची लोकल वेळापत्रकानुसार धावेल.

– ब्लाॅकपूर्वी रात्री १०.१४ वाजता कल्याण – सीएसएमटी लोकल असेल.

– ब्लाॅकपूर्वी रात्री १०.३३ वाजता कल्याण – सीएसएमटी लोकल असेल.

– ब्लाॅकनंतर पहिली धीमी लोकल सीएसएमटी – टिटवाळा सकाळी ६.१४ वाजता असेल.

– ब्लाॅकनंतर पहिली जलद लोकल सीएसएमटी – बदलापूर सकाळी ६.२४ वाजता असेल.

– ब्लाॅकनंतर पहिली धीमी लोकल ठाणे – सीएसएमटी पहाटे ५.३४ वाजता असेल.

– ब्लाॅकनंतर पहिली जलद लोकल कर्जत – सीएसएमटी पहाटे ४.५३ वाजता असेल.

– ब्लॉक कालावधीत भायखळा ते सीएसएमटी दरम्यान मुख्य मार्गावर आणि वडाळा ते सीएसएमटी हार्बर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल.

– मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील लोकल भायखळा, परळ, ठाणे आणि कुर्ल्यापर्यंत चालवण्यात येतील. तसेच या स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने धावतील.

– हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल वडाळा रोड स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. तसेच या स्थानकातून पनवेल दिशेकडे लोकल धावतील.

हार्बर मार्गावर

– ब्लाॅकआधी रात्री ११.३० वाजता सीएसएमटी ते पनवेल शेवटची लोकल असेल.

– ब्लाॅकआधी रात्री १०.२३ वाजता पनवेल ते सीएसएमटी शेवटची लोकल असेल.

– ब्लाॅकआधी रात्री ११.२६ वाजता सीएसएमटी ते गोरगाव शेवटची लोकल असेल.

– ब्लाॅकआधी रात्री १०.४९ वाजता वांद्रे ते सीएसएमटी शेवटची लोकल असेल.

– ब्लाॅकनंतर सकाळी ६.१६ वाजता सीएसएमटी ते पनवेल पहिली लोकल असेल.

– ब्लाॅकनंतर सकाळी ६.२८ वाजता सीएसएमटी ते गोरेगाव पहिली लोकल असेल.

– ब्लाॅकनंतर पहाटे ५.०५ वाजता पनवेल ते सीएसएमटी पहिली लोकल असेल.

– ब्लाॅकनंतर पहाटे ५.३३ वाजता गोरेगाव ते सीएसएमटी पहिली लोकल असेल.