सीएसटीकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक शनिवारी सकाळी आठच्या दरम्यान ठप्प झाली होती. कळवा आणि ठाणे दरम्यान जलद मार्गावरील लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक तब्बल अर्धा तास ठप्प झाली. त्यामुळे लोकलमध्ये अडकलेल्या काही चाकरमान्यांना रेल्वेमार्गातून पायपीट करीत ठाणे रेल्वे स्टेशन गाठावे लागले. काही वेळात ही लोकल ठाणे रेल्वे स्थानकात आणण्यात आली. त्यानंतर लोकल कारशेडला रवाना करण्यात आली.

Story img Loader