लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेवरील लातूर-सीएसएमटी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवारी सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला मोठा फटका बसला. जलद लोकल सेवांवर परिणाम झाला. यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास खूप उशीर झाला.

Stampede at Bandra Station
Bandra Stampede : “स्पेशल ट्रेनला १६ तास उशीर, एक्स्प्रेस फलाटावर येताच…”, पोलिसांनी सांगितला वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीचा घटनाक्रम!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Sanjay Raut bandra station stampede
Bandra Railway Station Stampede : “पाच महिन्यात २८ रेल्वे अपघात, पण रेल्वेमंत्री बुलेट ट्रेनच्या मस्तीत”, वांद्र्यातील घटनेनंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक
MMRDA, Kanjurmarg metro 6 carshed
कांजूरमार्ग कारशेड पुन्हा वादात, मेट्रो ६ मार्गिकेच्या कारशेडच्या कामाला न्यायालयाची स्थगिती
Shalimar express
नागपूर: शालिमार एक्स्प्रेस रुळावरून घसरली, प्रवासी जखमी
suburban train derails
लोकल घसरल्याने १०० फेऱ्या रद्द l कल्याणजवळची घटना, लाखो प्रवाशांचे हाल
Megablock on Central Railway, Megablock on Central Railway on Sunday,
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
Mumbai local
मुंबई: ऐन गर्दीच्या वेळी सिग्नल यंत्रणेतील बिघाडाचा प्रवाशांना फटका

सोमवारी सकाळी ८.१५ च्या सुमारास लातूर एक्स्प्रेसमध्ये कळवा स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला. ठाणे स्थानकाकडे जाण्यापूर्वी एक्स्प्रेस सुमारे २० मिनिटे थांबवण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे सेवा कोलमडली. तांत्रिक बिघाडामुळे नागपूर-सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेससह इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. लातूर एक्स्प्रेस सकाळी ८.५१ वाजता मार्गस्थ झाली, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी वाचा- Mumbai Rain Update : मुंबईत आज मुसळधारेचा अंदाज

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल सेवांना सुमारे ३० मिनिटे उशीर झाला. तसेच काही जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्याने धीम्या मार्गावरील लोकल सेवा कोलमडली. ज्यामुळे सर्व प्रवाशांना विलंब यातना सहन कराव्या लागल्या.