तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली नाही, असा एकही दिवस रेल्वेच्या नशिबात लिहिलेला नाही. मंगळवारी पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्यानंतर बुधवारी मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या नशिबी पेंटोग्राफने खोडा घातला.
बदलापूरहून मुंबईच्या दिशेने येणारी लोकल गाडी बदलापूर स्थानकातून निघत असताना ११.४७ वाजता तिचा पेंटोग्राफ तुटला. ही गाडी बदलापूरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून अप मार्गावर येत असल्याने गाडी डाउन आणि अप असे दोन्ही मार्ग अडवून बंद पडली. हा तांत्रिक बिघाड मार्गी लावण्यासाठी रेल्वेला एका तासाचा कालावधी लागला. अखेर ही गाडी दुपारी १२.५० वाजता पुढे रवाना झाली. या दरम्यान, मध्य रेल्वेची कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूक फक्त अंबरनाथ स्थानकापर्यंत चालवली जात होती. त्यामुळे मध्य रेल्वेच्या आठ सेवा रद्द करण्यात आल्या. तर इतर सेवा तब्बल अर्धा तास उशिराने धावत होत्या. या बिघाडाचा परिणाम संध्याकाळपर्यंत मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेवर झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा