मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-कसारा दरम्यान ट्रेन अर्धातास उशिराने धावत आहेत. खडवली-वासिंददरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असला तरी या मार्गावर लोकल उशिराने धावत आहेत.

ऐन सकाळच्यावेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नोकरी-व्यवसायासाठी मुंबईला येण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. उपनगरीय रेल्वेने प्रवास करताना ऐन गर्दीच्यावेळी कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड, रेल्वे रुळाला तडे, ओव्हरहेड वायर तुटणे असे प्रकार नेहमीच घडत असतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

Story img Loader