मुंबई : मध्य रेल्वेने एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत तब्बल २२.३५ दशलक्ष टन मालवाहतूक करून २,३५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या काळात सिमेंट, कंटेनर, पेट्रोलियम उत्पादने, लोह-स्टील, लोहखनिज याची वाहतूक करण्यात आली आहे. तर, मध्य रेल्वेने जून महिन्यात ७.४० दशलक्ष टन मालवाहतूक केली असून आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट मालवाहतूक असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. मध्य रेल्वेने फक्त जून महिन्यात मालवाहतूक करून ८०६ कोटी रुपये महसूल मिळवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मध्य रेल्वे प्रवासी वाहतुकीसह मालवाहतुकीवर विशेष भर देत आहे. मालवाहतुकीसाठी रेल्वेने खास वेळापत्रक तयार केले आहे. प्रवासी वाहतुकीपेक्षा रेल्वेला मालवाहतुकीतून अधिक महसूल मिळतो. मध्य रेल्वेने एप्रिल ते जून या काळात २२.३५ दशलक्ष टन मालवाहतूक केली. तर, याच कालावधीत गेल्यावर्षी २२.३४ दशलक्ष टन मालवाहतूक केली होती. त्याच्या तुलनेत यंदा मालवाहतुकीत ३.३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच एप्रिल-जून २०२३ मध्ये मालवाहतुकीमधून मध्य रेल्वेने २,३५४.४० कोटी रुपयांची कमाई केली. तर, गेल्यावर्षी याच कालावधीत २,१५३.९० कोटी रुपये कमाई केली. गेल्यावर्षीच्या तुलनेत ती ९.३१ टक्क्यांनी अधिक आहे.

हेही वाचा – मुंबई : पुनर्मुल्यांकनाचे निकाल तात्काळ जाहीर करा, युवा सेनेची परीक्षा विभागाकडे मागणी

गेल्या वर्षी जून महिन्यात ७.१७ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली होती. त्यातून रेल्वेला ७२० कोटी रुपये महसूल मिळाला होता. यंदा जून महिन्यात ७.४० दशलक्ष टन मालवाहतूक करून ८०६.१० कोटी रुपये महसूल मध्य रेल्वेला मिळाला आहे. जून महिन्यात रेल्वेने सिमेंट आणि क्लिंकरचे २३६ रेक, ऑटोमोबाईल्सचे ९७ रेक, कंटेनरचे २ हजार ५९८ रेक, पेट्रोलियम उत्पादनांचे २११ रेक, लोह-स्टीलचे १५२ रेक, लोहखनिजाच्या ६८ रेकची वाहतूक केली, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.