कुलदीप घायवट

मुंबई : मध्य रेल्वेवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वेकडून अनेक उपाययोजना, मोहिमा राबविल्या जातात. यामधील मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाद्वारे ‘माय लेफ्ट इज माय राइट..’ ही मोहीम सुरू केली. मात्र या मोहिमेचा विसर मध्य रेल्वेला झाल्याचे दिसून येत आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात डाव्या बाजूने चढणारा सरकता जिना असणे आवश्यक असताना, उजव्या बाजूने चढणारा जिना आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये घोळ होत असून भविष्यात मोठा अपघात घडण्याची भीती आहे.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) विभागाने जुलै २०१९ पासून ‘माय लेफ्ट इज माय राइट- प्लीज कीप लेफ्ट’ ही सर्वात मोठी जनजागृती मोहीम सुरू केली. ज्यातून प्रवाशांना पादचारी पूल, सरकता जिन्यावरून डाव्या बाजूने चालण्याचे आवाहन केले जाते. लोकलमध्ये चढताना आणि उतरताना, रेल्वेच्या फाटकाचा वापर करताना डाव्या बाजूचा वापर करा, पायऱ्या, सरकते जिने आणि पादचारी पूल चढताना आणि उतरताना डाव्या बाजूचा वापर करा. जेणेकरून चेंगराचेंगरीच्या घटना, चोरीच्या घटना टाळता येतील, असे आवाहन मध्य रेल्वेकडून केले आहे.

दरम्यान, नियमानुसार, फलाटावरील दोन सरकते जिने असताना, उजव्या बाजूच्या सरकत्या जिन्याने प्रवासी उतरतात. तर डाव्या बाजूच्या सरकत्या जिन्याने प्रवासी चढतात. परंतु सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या मध्य रेल्वेवरील दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक तीन आणि चारवरील सरकत्या जिन्याची रचना चुकीच्या पद्धतीची आहे.

दादर रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याच्या रचनेत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, मुंबई विभागातील इतर सरकत्या जिन्यांची तपासणी करून त्यामधील दोष दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. – रजनीश कुमार गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे

मध्य रेल्वेकडून उभारलेल्या अनेक जिन्यांची रचना  चुकीची आहे. त्यामुळे प्रवाशांची  गैरसोयीचे होते. – नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ

Story img Loader