देशभरात मध्य रेल्वेची माल वाहतूक सेवा सुरू असून अनेक अत्यावश्यक वस्तूंची जलदगतीने वाहतूक करण्यात येते. या माल वाहतुकीतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत भर पडत आहे. एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेने ७३.१६ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे. तर फेब्रुवारी २०२३ मध्ये ७.११ दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली. माल वाहतुकीतून मध्य रेल्वेला ७२७.२७ कोटी रुपये महसूल मिळाला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात १६.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत माल वाहतुकीतून मध्य रेल्वेला ६२५.८९ कोटी उत्पन्न मिळाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> खारकोपर लोकल दुर्घटनेच्या अहवालास विलंब; मुंबई विभागाऐवजी मुख्यालयातील अधिकारी दुर्घटनेची चौकशी करणार

मध्य रेल्वेने फेब्रुवारी २०२३ मध्ये ९०३ मालवाहू डब्यांतून कोळशाची वाहतूक केली होती. तर फेब्रुवारी २०२२ मध्ये ८८५ डब्यांतून कोळसा नियोजित स्थळी पोहोचविण्यात आला होता. फेब्रुवारी २०२३ मध्ये १४४ मालवाहू डब्यांमधून लोखंड आणि स्टीलची वाहतूक करण्यात आली असून फेब्रुवारी २०२२ मध्ये लोखंड आणि स्टीलची १०२ डब्यांतून वाहतूक करण्यात आली होती. तसेच फेब्रुवारी २०२२ मधील ५० मालवाहू डब्यांतून वाहनांच्या सुट्ट्या भागांची ने-आण करण्यात आली होती. तर फेब्रुवारी २०२३ मध्ये ७६ डब्ब्यांतून वाहनांचे सुट्टे भास नियोजित स्थळी पोहोचविण्यात आले. फेब्रुवारी २०२२ मध्ये १६ मालवाहू डबे भरून कांद्याची वाहतूक करण्यात आली होती.  फेब्रुवारी २०२३ मध्ये ४२ डब्यांतून कांद्याची वाहतूक करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये पेट्रोलियम उत्पादनांची २०० डब्यांमधून (फेब्रुवारी २०२२ मध्ये १७६ डब्यांतून) वाहतूक करण्यात आली होती. गतवर्षीच्या तुलनेत फेब्रुवारी २०२३ मध्ये ११४ मालवाहू डब्यांतून खताची वाहतूक करण्यात आली होती. तसेच मागील वर्षी या महिन्यात ८७ मालवाहू डब्यांतून खताची वाहतूक करण्यात आली होती, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.