मुंबई : उन्हाळी हंगामात मुंबईहून उत्तरेला जाणाऱ्या अधिक रेल्वेगाड्यांना होत असलेली गर्दी लक्षात घेता मुंबई आणि गोरखपूरदरम्यान २८ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०५३२५ गोरखपूर ते एलटीटी विशेष २६ एप्रिलपासून १० मेपर्यंत (फक्त २७ एप्रिल वगळून) दररोज रात्री ९.१५ गोरखपूर येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गाडी क्रमांक ०५३२६ एलटीटी-गोरखपूर विशेष २८ एप्रिल ते १२ मे (फक्त २९ एप्रिल वगळून) दरम्यान दररोज सकाळी १०.२५ वाजता एलटीटी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, बाराबंकी, गोंडा, मनकापूर, बस्ती आणि खलीलाबाद येथे थांबे असतील.

हेही वाचा…मालाडमध्ये शौचालयाच्या टाकीत उतरलेल्या दोन कामगारांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर २५ एप्रिल रोजी विशेष शुल्कासह विशेष रेल्वेगाडीचे आरक्षण सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.