लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पनवेल – रीवा (मध्य प्रदेश) दरम्यान २० साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक ०१७५२ साप्ताहिक उन्हाळी विशेष पनवेल येथून २५ एप्रिल ते २७ जूनदरम्यान दर सोमवारी मध्यरात्री १२.४५ वाजता सुटेल आणि रीवा येथे मंगळवारी रात्री ८.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१७५१ साप्ताहिक उन्हाळी विशेष २४ एप्रिल ते २६ जून या कालावधीत दर रविवारी मध्यरात्री १२.३० वाजता रीवा येथून सुटेल आणि पनवेल येथे सोमवारी रात्री ११.३५ वाजता पोहोचेल.

हेही वाचा… भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असताना अजित पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, म्हणाले, “प्रत्येकी २० लाख…”

या एक्स्प्रेसला कल्याण, नाशिक, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर आणि सतना येथे थांबा देण्यात येणार आहे. या एक्स्प्रेसचे आरक्षण १९ एप्रिलपासून विशेष शुल्कासह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Story img Loader