मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई महानगरात पावसाचा जोर वाढला असून पावसामुळे गुरुवारी लोकलचा खोळंबा झाला होता. काही मिनिटांच्या प्रवासासाठी तासभर लागत होता. तर शुक्रवारी मध्य रेल्वेवरील उंबरमाळी – कसाऱ्यादरम्यान डाऊन दिशेला जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. या बिघाडामुळे मध्य रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले. ऐन गर्दीच्या वेळीच हा बिघाड झाल्याने रेल्वे स्थानक आणि लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शुक्रवारी सकाळी ९.१५ च्यादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कसारा – सीएसएमटी आणि सीएसएमटी – कसारा दोन्ही दिशेकडील लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तब्बल एक तासानंतर सकाळी १०.१५ वाजता सिग्नल यंत्रणेतील बिघाडाची दुरुस्ती केली. मात्र यामुळे लोकल सेवा विलंबाने धावत आहे.