प्रवाशांची ‘लाईफलाईन’ विस्कळीत होण्याचे मध्यरेल्वेचे रडगाणे आज (बुधावार) सकाळी पुन्हा सुरू झाले. सकाळी ११:४७ वा. मध्यरेल्वेच्या बदलापूर स्थानकाजवळ मुंबई सीएसटीकडे येणाऱया मार्गावरील पेंटाग्राफ तुटला होता. त्यामुळे फक्त अंबरनाथपर्य़ंतच गाड्या सुरू होत्या. त्यापुढे सीएसटीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली होती.
मध्यरेल्वे प्रशासनाने तुटलेला पेंटाग्राफ आता दुरूस्त जरी केला असला तरी, रेल्वेसेवा तब्बल दोन-अडीच तास ठप्प होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. आता संपूर्ण मध्यरेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.
सकाळच्या ऐन गर्दी असतेवेळी मध्यरेल्वेने प्रवाशांना दगा दिल्याने कामावर जाताना प्रवाशांना मोठ्या अडचणींना समोरे जावे लागले. सर्वस्थानकांवर प्रवाशांचा गोंधळ उडाला होता.
(संग्रहित छायाचित्र)
बदलापूरजवळ तुटलेला पेंटाग्राफ दुरूस्त; ‘सीएसटी’कडे येणारी वाहतूक सुरू
मध्यरेल्वेच्या बदलापूर स्थानकाजवळ मुंबई सीएसटीकडे येणाऱया मार्गावरील पेंटाग्राफ तुटला होता. त्यामुळे फक्त अंबरनाथपर्य़ंतच गाड्या सुरू होत्या.
First published on: 11-12-2013 at 01:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway line collapse pantograph break down at badlapur