नेरळ रेल्वे स्थानकात कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एका मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने गुरुवारी सकाळी मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.
कर्जतहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली. जवळपास अर्धा तास हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी लागला आणि त्यानंतर मालगाडी पुढे रवाना करण्यात आली. मात्र त्यामुळे सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या लोकल अद्यापही दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे लोकल गाड्यांना गर्दी होत आहे.
हेही वाचा >>>“लढतीचा…” कडू विरुद्ध राणा वादावरून अनिल परब यांचा टोला; म्हणाले, “फोडणी कोण घालत आहे”
गेल्या काही महिन्यांपासून तांत्रिक बिघाड, लोकल किंवा मेल-एक्स्प्रेस डब्यातील आपत्कालीन साखळी विनाकारण खेचणे यासह अन्य कारणांमुळे लोकलचे वेळापत्रक बिघडत असून त्याचा मनस्ताप प्रवाशाना होत आहे. मात्र यानंतरही लोकल गाड्यांचा वक्तशीरपणा 95 टक्के असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे.