टिटवाळा रेल्वे स्थानकानजीक रूळाला तडे गेल्यामुळे बुधवारी सकाळी मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली. सध्या रूळाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असले तरी वाहतूक धीम्या गतीनेच सुरू आहे. दरम्यान, या दुरूस्ती कामामुळे मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या आणि उपनगरी दोन्ही सेवांवर परिणाम झाला होता. नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्यांचा खोळंबा झाला होता. मात्र, आता ही वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली आहे. परंतु, उपनगरीय रेल्वेच्या खोळंब्यामुळे सकाळच्या वेळेत नोकरदारांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Story img Loader