मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकावर गाडीच्या छतावरून प्रवास करणारा एक प्रवासी पेंटाग्राफला चिटकल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे. डाऊन मार्गावरील अनेक गाड्यांचा खोळंबा झाला असून मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर प्रवासी ताटकळत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, धीम्या मार्गावरील काही गाड्या जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. दरम्यान, थोड्यावेळापूर्वी वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे.

Story img Loader