मुंबई : मध्य रेल्वेच्या कर्जत येथील यार्डमध्ये सुधारणा, कर्जत स्थानकावरील पायाभूत कामे पूर्ण करण्यासाठी रविवार, १२ जानेवारी २०२५ रोजी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत बदलापूर – खोपोली लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लोकल अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेवरील पळसधरी आणि भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान अप, डाऊन आणि मधली मार्गिकेवर रविवार, १२ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १.५० ते ३.३५ या कालावधीत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत बदलापूर – खोपोली स्थानकांदरम्यानची लोकल सेवा बंद करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी १२.२० वाजता सुटणारी सीएसएमटी – खोपोली आणि दुपारी १.१९ वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत चालवण्यात येणार आहे. दुपारी १.४० वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येणार आहे.

हेही वाचा : मुंबई महानगरपालिकेकडून औषध वितरकांची १२० कोटींची देयके थकीत, देयके मंजूर न झाल्यास १३ जानेवारीपासून पुरवठा बंद करण्याचा इशारा

रविवारी दुपारी १.५५ वाजता सुटणारी कर्जत – सीएसएमटी लोकल, दुपारी १.४८ वाजता सुटणारी खोपोली – सीएसएमटी लोकल अंबरनाथ येथून चालवण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुपारी ३.२६ वाजता कर्जत – सीएसएमटी लोकल बदलापूर येथून सुटेल. गाडी क्रमांक २२१९४ ग्वाल्हेर – दौंड एक्स्प्रेस दुपारी २.५० ते ३.३५ दरम्यान चौक येथे थांबवण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेद्वारे देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway mega block in karjat leads badlapur khopoli trains cancelled on 12th january mumbai print news css