मुंबई : मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, नियमित रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त १३२ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून थेट ओडिशा, आसाम, मध्य प्रदेश या राज्यांतील प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेने यापूर्वी ८५४ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली होती. आता अतिरिक्त १३२ रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता एकूण ९८६ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या धावतील. यामधील २७८ अनारक्षित रेल्वेगाड्या असणार आहेत.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – खोरधा रोड साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या २६ फेऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नारंगी साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ८ फेऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – रीवा साप्ताहिक अतिजलद विशेष रेल्वेगाडीच्या २४ फेऱ्या, कोल्हापूर – कटिहार साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ८ फेऱ्या, लातूर – हडपसर द्वि-आठवड्यातील विशेष रेल्वेगाडीच्या १४ फेऱ्या, हडपसर – राणी कमलापती साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या २४ फेऱ्या, पुणे-इंदूर साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या २८ फेऱ्या अशा १३२ विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत.

सीएसएमटी – खोरधा साप्ताहिक विशेष

गाडी क्रमांक ०१०४९ साप्ताहिक विशेष गाडी ५ एप्रिल ते २८ जून या काळात दर शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११.०५ वाजता सुटेल आणि खोरधा रोड येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.५५ वाजता पोहोचतील. गाडी क्रमांक ०१०५० साप्ताहिक विशेष ७ एप्रिल ते ३० जूनपर्यंत दर सोमवारी खोरधा रोड येथून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२.५५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुरगी, वाडी, विकाराबाद, सिकंदराबाद, गुंटूर, विजयवाडा जंक्शन, राजमंड्री, सामलकोट जंक्शन. पिठापुरम, दुव्वाडा, कोत्तवलसा विजयनगरम, श्रीकाकुलम रोड, पलासा, ब्रह्मपुर आणि बालुगाव येथे थांबा असेल.

सीएसएमटी – नारंगी साप्ताहिक विशेष

गाडी क्रमांक ०१०६५ साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १० एप्रिल ते १ मे या काळात दर गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि नारंगी येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०६६ साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १३ एप्रिल ते ४ मेपर्यंत दर रविवारी नारंगी येथून पहाटे ५.२५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ८.२५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, कल्याण, इगतपूरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर, पाटलीपुत्र, हाजीपुर, बरौनी, बेगूसराय, खगडिया, नवगछिया, कटिहार, किशनगंज, अलुबारी रोड, न्यू जलपाईगुडी, न्यू कौचिबिहार, कोकराझार, न्यू बोंगाईगाव, रंगिया कामाख्या आणि गुवाहाटी येथे थांबा असेल.

सीएसएमटी – रिवा अतिजलद विशेष

गाडी क्रमांक ०२१८८ साप्ताहिक अतिजलद विशेष रेल्वेगाडी ११ एप्रिल ते २७ जून या काळात दर शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि रीवा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०२१८७ साप्ताहिक अतिजलद विशेष रेल्वेगाडी १० एप्रिल २६ जूनपर्यंत दर गुरुवारी रीवा येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, हरदा, इटारसी, पिपरिया, गदरवाडा, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर आणि सतना येथे थांबा असेल. या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण ३१ मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.