मुंबई : माथेरानची राणी अशी ओळख असलेली, नेरळ – माथेरानदरम्यान धावणारी मिनी ट्रेन पर्यटकांचे खास आकर्षण आहे. पावसाळ्यात येथील निसर्गाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. मात्र, पावसाळ्यात नेरळ – माथेरान नॅरो गेज मार्गावरील नेरळ – अमन लाॅज विभागादरम्यानची नियमित प्रवासी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा ८ जून ते १५ ऑक्टोबरपर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी केवळ माथेरान – अमन लॉजदरम्यानची शटल सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माथेरान-अमन लॉज शटल सेवा (दैनंदिन)

माथेरान येथून रोज सकाळी ८.२०, सकाळी ९.१०, सकाळी ११.३५, दुपारी २, दुपारी ३.१५, सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. ही गाडी अमन लॉज येथे अनुक्रमे सकाळी ८.३८, सकाळी ९.२८, सकाळी ११.५३, दुपारी २.१८, दुपारी ३.३३, सायंकाळी ५.३८ वाजता पोहचेल.

हेही वाचा – गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाआड येणारी बांधकामे हटवली, प्रकल्पाच्या कामाला वेग

अमन लॉज-माथेरान शटल सेवा (दैनंदिन)

अमन लॉज येथून रोज सकाळी ८.४५, सकाळी ९.४५, दुपारी १२, दुपारी २.२५, दुपारी ३.४०, सायंकाळी ५.४५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे अनुक्रमे सकाळी ९.०३, सकाळी ९.५३, दुपारी १२.१८, दुपारी २.४३, दुपारी ३.५८, सायंकाळी ६.०३ वाजता पोहचेल.

शनिवार – रविवारी विशेष गाडी माथेरान सकाळी १०.०५, दुपारी १.१० वाजता सुटेल. ही गाडी अमन लॉज येथे सकाळी १०.२३ दुपारी १.२८ वाजता पोहचेल. तसेच अमन लॉज येथून विशेष गाडी सकाळी १०.३०, दुपारी १.३५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे अनुक्रमे सकाळी १०.४८, दुपारी १.५३ वाजता पोहचेल.

हेही वाचा – कान महोत्सव गाजवणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांचा सत्कार

सोमवारी – शुक्रवारदरम्यान विशेष गाडी अमन लॉज येथून सकाळी १०.२२ वाजता सुटेल आणि माथेरान येथे सकाळी १०.४४ वाजता पोहचेल. तसेच माथेरान येथून दुपारी १२.२५ वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे दुपारी १२.४३ वाजता पोहचेल.

सर्व शटल सेवा तीन द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी डब्बा आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway neral aman lodge service closed during monsoon matheran aman lodge shuttle service will be operated mumbai print news ssb
Show comments