मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील नेरळ स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी विशेष ब्लॉक रविवारी घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी ८.३० ते दुपारी २.३० पर्यंत हा ब्लाॅक असेल. त्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आणि लोकलच्या वेळापत्रकात बदल केला आहे. अनेक लोकल पूर्णपणे तर, काही लोकल अंशत: रद्द केल्या आहेत. तसेच ब्लाॅकमुळे बदलापूर ते कर्जत स्थानकांदरम्यानची लोकल सेवा सकाळी ११.३० ते दुपारी २.३० पर्यंत बंद असेल. त्यामुळे रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी प्रवाशांचे हाल होणार आहेत.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त आणि मराठी नवीन वर्षानिमित्त अनेक कार्यक्रम घेण्यात येतात. सकाळच्यावेळी बऱ्याच ठिकाणी विविध कार्यक्रमांचे नियोजन असते. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यासाठी लोकल सेवेचा पर्याय असतो. परंतु, रविवारी मेगाब्लाॅक असल्याने प्रवाशांचा प्रवास रखडणार आहे. त्यातच नेरळ येथे पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ब्लाॅक घेण्यात आला आहे. त्यामुळे बदलापूर ते कर्जत लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.

या लोकल अंबरनाथपर्यंतच धावणार…

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत लोकल

– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५७ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत लोकल

– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३६ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत लोकल

– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१४ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत लोकल

ठाणे येथून दुपारी १२.०५ वाजता सुटणारी ठाणे ते कर्जत लोकल

– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १२.२० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोली लोकल

या लोकल बदलापूरवरून धावणार; कर्जत ते बदलापूर लोकल प्रवास रद्द

– कर्जत येथून सकाळी ११.२५ वाजता सुटणारी कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल

– कर्जत येथून दुपारी १२ वाजता सुटणारी कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल

– कर्जत येथून दुपारी १२.२३ वाजता सुटणारी कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल

– कर्जत येथून दुपारी १ वाजता सुटणारी कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल

– कर्जत येथून दुपारी १.२७ वाजता सुटणारी कर्जत – ठाणे लोकल

– कर्जत येथून दुपारी १.५५ वाजता सुटणारी कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथ स्थानकावरून चालवण्यात येईल.

गाडी क्रमांक ११०१४ कोइम्बतूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२१६४ चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२४९३ मिरज – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस कर्जत-पनवेल मार्गावरून वळवल्या जातील. तसेच पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबा दिला जाईल.

गाडी क्रमांक २२१५९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एक्स्प्रेस दुपारी २.११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत वांगणी स्थानकांदरम्यान थांबवण्यात येईल.