मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार फलाट तिकिटांच्या विक्रीवर २ ते ९ डिसेंबरपर्यंत निर्बंध घातले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिसांची खबरदारी, गर्दीच्या नियोजनासाठी रेल्वेकडून अनेक उपाययोजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशविदेशातील लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर प्रचंड गर्दी होते. त्यामुळे फलाटांवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने लांब पल्ल्यांच्या स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचानिर्णय घेतला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway temporarily banned platform ticket sales on dr babasaheb ambedkar death anniversary to control crowding mumbai print news sud 02