मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे गुजरातच्या वाटेवर असताना आता मुंबईच्या जीवनवाहिनीच्या म्हणजेच मध्य रेल्वेच्या नाडय़ाही गुजरातच्याच हाती सोपवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्य रेल्वेला लागणारी वीज आता गुजरातमधून घेण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन करत आहे. महावितरण आणि टाटा यांच्या विजेच्या तुलनेत गुजरातमधील वीज दोन ते तीन रुपये प्रतियुनिट स्वस्त आहे.
मध्य रेल्वेला दरमहा १६० दशलक्ष युनिट वीज लागते. त्यासाठी सध्या मध्य रेल्वेचे १४४ कोटी रुपये दरमहा खर्च होतात. रेल्वे ही वीज प्रामुख्याने महावितरण आणि टाटा यांच्याकडून घेते. महावितरणचा विजेचा दर सुमारे सात रुपये प्रतियुनिट होता. तर टाटाची वीज सुमारे साडेपाच रुपये प्रतियुनिट या दराने मिळत होती. मात्र, या दरांत वाढ करत महावितरणने प्रतियुनिट ९.२ रुपये आणि टाटाने ७.८ रुपये प्रतियुनिट दरआकारणी सुरू केली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या विजेच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. गुजरामध्ये हाच दर पाच ते सहा रुपये यादरम्यान आहे. त्यामुळे मध्य रेल्वे गुजरातकडून वीज विकत घेण्याचा विचार करत असल्याचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले. रेल्वे दरवाढीस होणारा विरोध, रेल्वेवर वीज दरवाढीमुळे पडणारा अतिरिक्त बोजा आणि भारतीय रेल्वेखात्यासमोरील आव्हाने लक्षात घेता, अन्य पर्यायांचा विचार करणे अनिवार्य होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा