मुंबई : शुद्ध पाण्यासाठी आणि कोणत्याही जलस्रोतांवर अवलंबून न राहता हवेतून पाण्याची निर्मिती करणारी यंत्रे स्थानकात बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. प्रथम पाच स्थानकांत १७ यंत्रे बसविण्यात येणार असून या कामासाठी एका कंपनीचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
इंडियन रेल्वे कॅटिरग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) रेल्वे स्थानकांत वॉटर व्हेंिडग यंत्रे बसविली आहेत. प् आता मध्य रेल्वे हवेवर प्रक्रिया करून पाण्याची निर्मिती करणारी यंत्रे स्थानकात बसवणार आहे. त्यासाठीही निविदा अंतिम करून कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. शुद्ध पाणी मिळण्यासाठी विविध प्रक्रिया करण्यात येणार आहेत. यंत्रात दूषित घटक वेगळे करण्यासाठी हवा गाळण्यात येईल. गाळलेली हवा यंत्राच्या कूिलग चेंबरमधून पुढे जाईल आणि तेथे हवेचे रूपांतर घनरूपात होईल. घनरूप हवा पाण्यात रुपांतरित होईल. त्यातून निर्माण होणारे पाणी साठवण टाकीमध्ये जमा होईल. टाकीमधूनही सोडण्यात येणारे पाणी विविध स्तरांच्या गाळणीतून पुढे जाईल. अशा सर्व प्रक्रियेनंतर हवेतून शुद्ध पाणी मिळणार आहे.
हवेतून निर्मिती केलेले शुद्ध पाणी प्रवाशांना उपलब्ध करणारी १७ यंत्रे पाच स्थानकांत बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी दरही निश्चित करण्यात आले आहेत. ३०० मिली लिटरसाठी पाच रुपये आकारले जाणार असून बॉटलसह पाणी हवे असल्यास त्यासाठी आणखी दोन रुपये आकारण्यात येतील. तर ५०० मिलिलिटरसाठी आठ रुपये, एक लिटरसाठी १२ रुपये दर आकारण्यात येणार आहेत. बाटलीबंद पाण्यासाठी अतिरिक्त पैसे घेण्यात येतील.
पुढील स्थानकांत सुविधा
सीएसएमटी स्थानकात पाच, दादर स्थानकात पाच, कुर्ला आणि घाटकोपर स्थानकात प्रत्येकी एक, ठाणे स्थानकात चार आणि विक्रोळी स्थानकात हवेचे पाण्यात रूपांतर करून ते पिण्यासाठी उपलब्ध करून देणारे यंत्र बसविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. संबंधित कंपनीसाठी पाच वर्षांचा करार करण्यात आला असून मध्य रेल्वेला दरवर्षी प्रत्येक यंत्रामागे दीड लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे.