मध्य रेल्वेच्या ठाणे-वाशी रेल्वेमार्गावर आजपासून (सोमवार) ते शनिवार, ३० नोव्हेंबरपर्यंत रोज दुपारी बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास रेल्वे रूळांच्या दुरूस्तीसाठी ‘मेगा ब्लॉक’ जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे २० गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
ठाणे-वाशी मार्गावरील रूळांची लांबी कमी असून त्यांना जोडणारे अंतरही कमी आहे. त्याचा परिणाम लोकलच्या वेगावर होत असून लोकल जलद असताना आवाज होऊन हादरे बसतात. हा त्रास कमी करण्यासाठी या मार्गावर जास्त लांबीचे रूळ टाकण्याचं काम सोमवार ते शनिवार दररोज दुपारी बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात येणार आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या (अप)
वाशी-ठाणे – ११.२५, ११.३९, १२.००, १२.२२, १२.५०, ०१.२०
नेरुळ-ठाणे – ११.३९, १२.०८, ०१.०२
पनवेल-ठाणे – १२.१३

रद्द करण्यात आलेल्या गाड्या (डाऊन)
ठाणे-वाशी – ११.४२, १२.००, १२.१३, ०१.००, ०१.२७
ठाणे-पनवेल – १२.०७, १२.५०, १.१३
ठाणे-नेरुळ – १२.२२

Story img Loader