मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी पुणे-मुंबई-पुणे मार्गावर पुन्हा एकदा प्रगती एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाकाळात प्रगती एक्स्प्रेस बंद होती. प्रगती एक्स्प्रेस पुन्हा सुरू करताना तिला विस्टाडोम डबा (पारदर्शक काचेचा डबा) जोडण्यात येणार आहे. ही गाडी २५ जुलैपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. मडगाव एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस पूर्वीपासूनच विस्टाडोम डब्यांसह धावत आहेत.

गाडी क्रमांक १२१२५ प्रगती एक्स्प्रेस सीएसएमटी येथून २५ जुलैपासून दुपारी ४.२५ वाजता सुटेल आणि पुणे येथे सायंकाळी ७.५० वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक १२१२६ पुणे येथून सकाळी ७.५० वाजता सुटेल आणि सकाळी ११.२५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ही एक्स्प्रेस दादर, ठाणे, पनवेल, कर्जत, लोणावळा, शिवाजी नगर येथे थांबेल. या गाडीला ११ द्वितीय श्रेणीचे आसन डबे जोडण्यात आले आहेत. यातील पाच डबे आरक्षित आणि चार अनारक्षित, एक डबा पासधारकांसाठी आणि एक महिलासाठी राखीव असणार आहे. एका वातानुकूलित आसन डब्याचाही समावेश आहे. एक जनरल द्वितीय श्रेणी डबाही जोडण्यात आला आहे. या गाडीचे आरक्षण २० जुलैपासून उपलब्ध आहे.

Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय

विस्टाडोम डबा :  मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला पहिल्यांदा २०१८ मध्ये विस्टाडोम डबा जोडण्यात आला होता. या डब्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे २६ जून २०२१ पासून मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्येही विस्टाडोम डबा जोडण्यात आला. प्रवाशांच्या मागणीनंतर १५ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई – पुणे मार्गावरील डेक्कन क्वीनलाही हा डबा जोडल्याचे मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. आता प्रगती एक्स्प्रेसलाही विस्टाडोम डबा जोडण्यात येणार आहे. काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, उत्तम आसन व्यवस्था, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, एलईडी स्क्रीन, दिव्यांगांसाठी रुंद सरकते दरवाजे अशा अनेक सुविधांचा त्यात समावेश आहे.

Story img Loader