वडाळा डेपो ते जेकब सर्कल या मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री जंबोब्लॉक घेण्यात येणार आहे. परळ ते करीरोड या स्थानकांदरम्यान घेतल्या जाणाऱ्या या ब्लॉकमुळे शनिवारी रात्री साडेबारापासून रविवारी पहाटे साडेपाचपर्यंत दादर ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. परिणामी नेहमी साडेबारा वाजता मुंबईहून सुटणारी शेवटची गाडी शनिवारपुरती १२.१० वाजता सुटणार आहे. त्यानंतरच्या सर्व गाडय़ा दादरहून रवाना होतील. वाहतुकीत खालीलप्रमाणे बदल होतील.
० छत्रपती शिवाजी टर्मिनसहून रात्री १२.३० वाजता कर्जतला रवाना होणारी शेवटची गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसऐवजी दादरहून रात्री १२.४८ वाजता रवाना होईल.
० मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून रात्री १२.१० वाजता कसाऱ्याला रवाना होणारी गाडी शेवटची असेल.
० मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून रविवारी सकाळी सुटणाऱ्या कसारा (४.१२ वा.), खोपोली (४.२५ वा.), कर्जत (४.५० वा.) आणि कसारा (५.०२ वा.) या गाडय़ा दादरहून सुटतील. तर आसनगाव (५.१४ वा.) ही गाडी कुल्र्याहून रवाना होईल. टिटवाळा (५.३० वा.) आणि कल्याण (६.०४ वा.) या गाडय़ा मुंब्य्राहून रवाना होतील.
० रविवारी ब्लॉकनंतर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून रवाना होणारी पहिली गाडी ५.४८ वाजता अंबरनाथसाठी रवाना होईल.
रद्द झालेल्या लोकल गाडय़ा
० मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या गाडय़ा
कल्याण (९.२४ वा.), कुर्ला (११.२५ वा.), कुर्ला (११.३९ वा.), ठाणे (११.५९ वा.) आणि ठाणे (१२.२३ वा.)
० मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या गाडय़ा
कल्याण (११.०५ वा.), ठाणे (४.०५ वा.), ठाणे (४.३९ वा.), ठाणे (५.०८ वा.), ठाणे (५.३१ वा.), कुर्ला (५.५४ वा.)

Story img Loader