अकोला : उन्हाळ्यामध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मदुराई ते भगत की कोठी आणि चेन्नई सेंट्रल भगत की कोठी दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष गाडी सेवा चालवणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.मदुराई ते भगत की कोठी विशेष गाडी क्रमांक ०६०६७ सोमवार, २१ एप्रिल रोजी मदुराई येथून १०.४५ वाजता सुटेल आणि भगत की कोठी येथे बुधवार १२.३० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०६०६८ विशेष गुरुवार, २४ एप्रिल रोजी भगत की कोठी येथून ०५.३० वाजता सुटेल आणि मदुराई येथे शनिवार रोजी ०८.३० वाजता पोहोचेल. या गाडीला दिंडीगूल, तिरुचिरापल्ली, वृद्धाचलम, विल्लूपुरम, चेंगलपट्टू, तांबरम, चेन्नई एग्मोर, सुल्लुरुपेटा, गुडूर, नेल्लोर, ओंगोल, विजयवाडा, खम्मम, वारंगल, बल्लारशाह, चंद्रपूर, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, अंकलेश्वर, वडोदरा, आनंद, साबरमती, मेहसाणा, पाटण, भिलडी, राणीवारा, मारवाड भिनमाळ, मोडरान, जालोर, मोकलसर, समदरी, लुनी येथे थांबा राहील. सहा तृतीय वातानकूलित इकॉनॉमी कोच, १२ तृतीय वातानकूलित, दोन सामान व ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना राहणार आहे.
चेन्नई सेंट्रल ते भगत की कोठी विशेष गाडी क्रमांक ०६०५७ चेन्नई सेंट्रल येथून १९.४५ वाजता सुटेल आणि भगत की कोठी येथे मंगळवारी १२.३० वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०६०५८ बुधवार, २३ एप्रिल रोजी भगत की कोठी येथून ५.३० वाजता सुटेल आणि चेन्नई सेंट्रल येथे शुक्रवारी २३.१५ वाजता पोहोचेल. या गाडीला सुल्लुरुपेटा, गुडूर, नेल्लोर, ओंगोल, विजयवाडा, खम्मम, वारंगल, बल्लारशाह, चंद्रपूर, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, अंकलेश्वर, वडोदरा, आनंद, साबरमती, मेहसाणा, पाटण, भिलडी, राणीवारा, मारवाड भिनमाळ, मोडरान, जालोर, मोकलसर, समदरी, लुनी येथे थांबा राहील. एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १६ शयनयान, दोन लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना राहणार आहे. या विशेष गाड्यांच्या विस्तृत वेळापत्रक व थांब्यांची माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. विशेष रेल्वे गाड्यांमुळे गर्दीच्या काळात प्रवाशांना मोठी सुविधा निर्माण झाली आहे.