Breastfeeding Pods at CSMT, Dadar, Thane and Kalyan: तान्ह्या बाळासह रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास अधिक सोयीचा व्हावा यासाठी मध्य रेल्वेकडुन एक विशेष सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडुन स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी ‘ब्रेस्टफिडिंग पॉड्स’ उभारण्यात येणार आहेत. सीएसएमटी, दादर, ठाणे यांसाह एकुण ७ रेल्वे स्थानकांवर हे ‘ब्रेस्टफिडिंग पॉड्स’ उभारण्यात येणार आहेत.

लहान बाळांसह प्रवास करणे ही सर्व महिलांसाठी तारेवरची कसरत असते. त्यामुळे प्रवासादरम्यान स्तनपान करणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी हे नर्सिंग पॉड्स उभारण्यात येणार आहेत. हे नर्सिंग पॉड्स ‘नॉन फेअर रिव्हेन्यू’तून उभारण्यात येणार आहेत आणि हे मोफत उपलब्ध असेल.

आणखी वाचा- Video: रोज गांजा घ्या.. मुंबईत रस्त्यावर झळकले पोस्टर; मुख्यमंत्री शिंदेंना नेटकरी म्हणतात, “तुम्ही आता..”

या योजनेअंतर्गत सीएसएमटी स्थानकात १, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी ३, ठाणे आणि लोणावळा येथे प्रत्येकी २, कल्याण आणि पनवेल इथे प्रत्येकी एक असे नर्सिंग पॉड्स उपलब्ध असतील. प्रत्येक पॉडमध्ये बसण्यासाठी सुविधा, डायपर चेंजिग स्टेशन, पंखा, लाईट अशा सुविधा उपलब्ध असतील.