मध्य रेल्वेच्या कर्जत-बदलापूर दरम्यान दुपारी दोन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास रेल्वेचा डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सीएसटीकडे येणाऱ्या एका लोकलचा पहिला डबा बदलापूर स्थानकाजवळ अचानक रेल्वेरुळावरून घसरला त्यामुळे मध्ये रेल्वे वाहतूकीला ब्रेक लागला होता. हा डबा घसरून विरुद्धबाजूच्या रेल्वे मार्गावर आल्याने दुसऱ्या बाजूची रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे होती. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
आज रविवार असल्याने प्रवाशांची रिघ नव्हती. तरी विकेन्डसाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांना घरी परतताना प्रवासादरम्यान मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. मेगा ब्लॉक असल्यामुळे मध्यरेल्वेची ‘घसरलेली’ वाहतूक पूर्ववत होण्यास दीड तासांचा कालावधी लागला.
(संग्रहित छायाचित्र)