आषाढी एकदशीपासून जोर धरलेल्या पावसाने सध्या विश्रांती घेतली असून रखडलेली ‘लाईफ लाईन’ही पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. 
परंतु, येत्या २४ तासांत महाराष्ट्रभर मुसळधार होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविलेली आहे.   मुंबईत मुसळधार पावसाने रेल्वे सेवेला चांगलेच झोडपले होते. कुर्ला स्थानकावर रेल्वेरुळांवर पाणी साचल्याने हार्बर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, तर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे सेवाही विस्कळीत झाली होती. दुपारनंतर वरुणराजाने विश्रांती घेतल्याने आता रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. तसेच ठीकठीकाणी साचलेल्या पाण्याचा निचराही झाला आहे. त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास घरी परतणाऱया चाकरमान्यांना हे दिलासादायक ठरणारे आहे. 

Story img Loader