रेल्वे पोस्ट गती शक्ती एक्सप्रेस सेवेचा भाग म्हणून संयुक्त पार्सल उत्पादनाच्या सेवा सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभाग आणि भारतीय पोस्ट यांनी हातमिळवणी केली आहे. ही पार्सल उत्पादन सेवा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई विभागातील भिवंडी व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) येथून दर सोमवारी साप्ताहिक पार्सल व्हॅन सुटेल. भिवंडी रोड येथून पहिली गाडी २० फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता सुटून हावडा येथील सांकरेल गुड्स टर्मिनस येथे बुधवारी दुपारी ४ वाजता पोहचेल. १५ डब्यांची ही पार्सल व्हॅन इगतपुरी, भुसावळ, बडनेरा, नागपूर, इतवारी आणि झारसुगुडा येथे थांबणार आहे. भिवंडी रोड स्थानक हे मध्य रेल्वे मुंबई विभागातील सर्वात यशस्वी व्यवसाय विकास युनिट म्हणून उदयास आले आहे.

हेही वाचा >>> रघुवंशी मिल आग दुर्घटना; वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दल हतबल

एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत, भिवंडी रोड येथे व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) द्वारे १९.३४ लाख पॅकेजमधून २४ हजार ७२८ टन पार्सल पाठवले आहे. यातून १३.०६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ कालावधीत १२.५३ लाख पॅकेजेसमधून १४ हजार ९४६ टनांच्या पार्सलद्वारे ८.३५ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.  मुंबई आणि ठाणे शहराजवळ भिवंडी असल्याने रेल्वेद्वारे जेएनपीटी बंदराशी आणि उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गाशी उत्तम जोडणी, मोठी गोदामे, ई-कॉमर्स सुविधा आणि माल घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी पुरेशी जागा आहे. भारतीय रेल्वेने आणि भारतीय पोस्टच्या समन्वयाने एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत माल पाठवण्याकरिता सेवा प्रदान करेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railways indian postal department joined hands for production parcel service mumbai print news zws