मुंबई : मध्य रेल्वेने सप्टेंबर महिन्यात ५०.७६ लाख टन मालवाहतूक केली असून मध्य रेल्वेच्या तिजोरीत यातून ६१० कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२२ मध्ये ५०.६५ लाख टन मालवाहतूक केली होती. या तुलनेत सप्टेंबर २०२३ मध्ये मालवाहतुकीत १.९० टक्क्यांची वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या १५२ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीकडून टाच

मध्य रेल्वेने एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीसाठी ४१.६६ मेट्रिक टन मालवाहतूक केली. एप्रिल ते सप्टेंबर २०२२ मध्ये ती ३७.९९ मेट्रिक टन इतकी होती. या तुलनेत यंदा मालवाहतुकीत ९.७० टक्क्यांची झाली वाढ झाली असून मध्य रेल्वेवरील आतापर्यंतची ही सर्वोत्तम मालवाहतूक ठरली आहे. मध्य रेल्वेला सप्टेंबर २०२२ मध्ये मालवाहतुकीद्वारे ५७१ कोटी रुपये महसूल मिळाला होता. सप्टेंबर २०२३ मध्ये ६१० कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मध्य रेल्वेला लीज पार्सल सर्व्हिसेसमधून २.६६ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. यामध्ये मुंबई ते संकराईल गुड्स यार्ड (पश्चिम बंगाल) ८ सेवा, भिवंडी/जळगाव/नागपूर ते आजरा (आसाम) ३ सेवा, गोधनी/कलमेश्वर ते न्यू तिनसुकिया (आसाम) २ सेवा, सावदा ते आदर्श नगर दिल्ली- १ सेवा आणि देहू रोड-बाडमेर (राजस्थान) १ सेवा चालविण्यात आल्या, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railways registers record freight revenue of rs 610 cr in one month mumbai print news zws