मुंबई: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची राज्यात कासवगतीने अंमलबजावणी सुरू असून अनेक योजना कागदावरच आहेत. त्यामुळे केंद्राकडून मिळणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या निधीवर सरकारला पाणी सोडावे लागू शकते. याबाबत बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. एवढेच नव्हे तर रखडलेल्या योजनांची गती वाढविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनास दिले आहेत. केंद्र सरकार पुरस्कृत महत्त्वाकांक्षी योजनांच्या राज्यातील अंमलबजावणीचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीत प्रधानमंत्री ग्रामसडक, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), जलजीवन मिशन, प्रधानमंत्री किसान सन्मान, स्वामित्व- ड्रोनद्वारे गावांचे सर्वेक्षण, मृद आरोग्य पत्रिका (सॉइल हेल्थ कार्ड), किसान क्रेडिट कार्ड, अटल पेन्शन योजना, स्वनिधी योजना त्याचप्रमाणे आयुष्मान भारत जनआरोग्य योजना व राज्य पुरस्कृत महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात काही विभागांच्या योजनांची अंमलबजावणी अत्यंत संथगतीने होत असल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा