मुंबई : राज्यातील पहिले ‘पीएम-मित्र पार्क’ हे वस्त्रोद्योग उद्यान अमरावतीत उभारण्यात येणार असून त्याबाबत रविवारी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. तूर्त या वस्त्रोद्योग उद्यानाबाबत चार कंपन्यांनी राज्य सरकारशीही १,३२० कोटींचे सामंजस्य करार केले.

‘पीएम मित्र पार्क’ केंद्राबाबत सामंजस्य करार करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अमरावतीमध्ये विशाल वस्त्रोद्योग केंद्र सुरू होत आहे. या ठिकाणी अनेक प्रकल्प येतील. त्यातून राज्यातील तरुणांना नोकऱ्या मिळतील, रोजगार निर्माण होईल. राज्याची आर्थिक भरभराट होईल. राज्यात येणाऱ्या उद्योगधंद्यांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली.

goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
traffic congestion, Parking problem APMC navi mumbai double parking, trucks
एपीएमसीतील पार्किंग समस्या जटिल, ट्रकच्या दुहेरी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अमरावती येथे वस्त्रोद्योग केंद्र उभारण्यास मान्यता दिली असून त्याचा करारही झाला आहे. राज्यात वस्त्रोद्योग धोरण अमलात आणले गेले तेव्हा कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे केंद्र सुरू व्हावे, अशी अपेक्षा होती. त्यानुसार आम्ही सत्तेवर आल्यानंतर अमरावती येथे एकात्म वस्त्रोद्योग केंद्र सुरू करण्यासाठी पावले उचलली. विक्रमी वेळेत जमिनीचे संपादन केले. तसेच विक्रमी वेळेत हे केंद्र नावारूपास येईल, असा आशावाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यावेळी उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे एक हजार २० एकर जागेवर ‘पीएम मित्र पार्क’ हे वस्त्रोद्योग उद्यान उभारण्यात येणार आहे.

उद्योगांना पायघडय़ा

यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा म्हणून एक लाख कोटी डॉलर इतकी भर घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यात येणाऱ्या उद्योगांना सर्वतोपरी मदत केली जाईल आणि उद्योगधंद्यांसाठी सरकारतर्फे पायघडय़ा अंथरण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

१,३२० कोटींचे सामंजस्य करार

‘पीएम मित्र पार्क’ हे वस्त्रोद्योग उद्यान विकसित करण्याबाबत चार उद्योगांशी १,३२० कोटींचे चार सामंजस्य करार करण्यात आले. सनाथन पॉलिकॉट (एक हजार कोटी), पॉलिमन इंडिया (२० कोटी), प्रताप इंडस्ट्रीज (२०० कोटी), तर सिद्धिविनायक कॉटस्पिन (१०० कोटी) असे या करारांचे स्वरूप आहे.

पार्श्वभूमी..

केंद्र सरकारने ‘पीएम-मित्र पार्क’ची घोषणा १५ जानेवारी २०२२ रोजी केली होती. केंद्राच्या सहकार्याने ही केंद्रे उभारण्यासाठी अनेक राज्यांनी आपले प्रस्ताव सादर केले होते. मार्च २०२३ मध्ये, सात केंद्रे स्थापनेसाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्राने महाराष्ट्रासाठी अमरावती जिल्ह्यात वस्त्रोद्योग केंद्राला मान्यता दिली होती.

असे असेल वस्त्रोद्योग उद्यान

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे एक हजार २० एकर जागेवर ‘पीएम मित्र पार्क’ हे वस्त्रोद्योग उद्यान उभारण्यात येणार आहे. त्यात इन्क्युबेशन केंद्र, प्लग अँड प्ले, वीज, रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, सीईटीपी यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे. या उद्यानाद्वारे सुमारे तीन लाख जणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकेल.