मुंबई: मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या मागणीवरून आक्रमक भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लवकरच केंद्राचे सुरक्षा कवच मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे यांना येणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी मनसेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडम्े पत्राद्वारे केली आहे.

राज ठाकरे यांना सध्या राज्य सरकारची ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आहे. गेल्या काही दिवसात राज्य सरकारविरोधात भूमिका घेतल्यानंतर सरकारने राज यांची सुरक्षा कमी केल्याचा मनसेचा आरोप आहे. ठाकरे यांना येणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरविण्याबाबत बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला ७ फेब्रुवारी रोजी पत्र लिहून

सुरक्षा वाढविण्याची मागणी केली होती. याबाबत निर्णय घेण्यात आलेला नसल्याने पुन्हा राज्य सरकारला पत्र लिहिणार  असून,  गृहमंत्री अमित शहा यांना देखील विनंती करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.