केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर मुंबईकरांसाठी ‘अच्छे दिन’ येत असल्याचे संकेत या दिवाळीत मिळाले असून मध्य रेल्वेने धनत्रयोदशीचे औचित्य साधून तब्बल ४२५ कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी नियोजित प्रकल्पांपैकी प्राधान्याने पूर्ण करण्याच्या प्रकल्पांची यादी रेल्वे बोर्डाकडे पाठवली असून यात सुरक्षेशी निगडित प्रकल्पांवर भर देण्यात आला आहे.
प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईकरांना दुय्यम वागणूक होत असल्याची टीका सातत्याने होत असते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभा निवडणूक प्रचार मोहिमेत रेल्वे सुरक्षा, मुंबईची उपनगरीय लोकल सेवा यांना प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार रेल्वे बोर्डाने आता मुंबई विभागातील प्रलंबित प्रकल्पांची माहिती मागवली आहे.
सूद यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह झालेल्या ‘वर्क प्रोग्राम मिटींग’मध्ये प्रलंबित प्रकल्पांची चर्चा केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आल्याचे सूद यांनी सांगितले.
मुंबईकरांना म.रे.ची दिवाळी भेट!
केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर मुंबईकरांसाठी ‘अच्छे दिन’ येत असल्याचे संकेत या दिवाळीत मिळाले असून मध्य रेल्वेने धनत्रयोदशीचे औचित्य साधून तब्बल ४२५ कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-10-2014 at 12:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Centrral railway send 425 crore proposal work to railway board