मुंबई: मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या जुन्या-नव्या दलालांना तसेच विकासकांकडे खरेदी-विक्रीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता १ जानेवारीपासून महारेरा प्रमाणपत्र बंधनकारक असेल. या प्रमाणपत्राशिवाय नवीन दलालांची नोंदणी होणार नाही किंवा जुन्या दलालांच्या नोंदणीचे नूतनीकरण होणार नाही. विना नोंदणी आणि महारेरा प्रमाणपत्राशिवाय दलाल म्हणून काम कारणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.
स्थावर संपदा क्षेत्रात खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या दलालांकडून अनेकदा फसवणूक होते. दलाल म्हणून काम करण्यासाठी कोणतेही शिक्षण वा कौशल्य शिक्षण नसते. या सर्व बाबी लक्षात घेऊन महारेराने १० जानेवारीला दलांलाच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहीत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या अटीची पूर्तता करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. मात्र अजूनही अनेक दलालांनी प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र सादर केलेले नाही. आता मात्र कोणतीही मुदतवाढ न देता १ जानेवारीपासून महारेराचे प्रमाणपत्र असल्याशिवाय नवीन दलाल म्हणून नोंदणी किंवा नुतनीकरण न करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. तसे आदेश नुकतेच महारेराने दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या परवानाधारक दलालांना आणि विकासकांकडील या कामांशी संबंधित कर्मचाऱ्यांनाही १ जानेवारी २०२४ पूर्वीच प्रमाणपत्र मिळवून त्यांच्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक असेल. विकासकांनीही त्यांच्या व्यवहारांसाठी १ जानेवारीनंतर अशाच प्रशिक्षित दलालांची नावे संकेतस्थळावर ठेवावी आणि त्यांची मदत घ्यावी, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा… शहरातील एलआयसीच्या ६८ इमारती धोकादायक! म्हाडाचा कारवाईचा इशारा
दरम्यान या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर महारेराकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या तीन परीक्षांमधून सुमारे आठ हजार दलाल पात्र ठरलेले आहेत. तेव्हा ग्राहकांनी आता मालमत्ता खरेदी- विक्री करताना महारेरा नोंदणीधारकांकडूनच व्यवहार करावेत असे आवाहन महारेराने केले आहे.