मुंबईमधील CGST भिवंडी आयुक्तालयाने १३२ कोटींच्या बनावट इनव्हॉइस रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बनावट इनव्हॉइस जारी करणे, २३ कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेणे किंवा पास करणे अशा बनावट इनव्हॉइस रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या सिंडिकेटचा मूख्य सूत्रधार असलेल्या हसमुख पटेल यास अटक करण्यात आली असून, तो २३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत असणार आहे.
यापूर्वी ऑगस्टमध्येही, CGST भिवंडी आयुक्तालयाने इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवण्यासाठी बनावट बिलांच्या आधारे दावे करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे.
सीजीएसटी भिवंडीचे आयुक्त सुमित कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ही टोळी बनावट जीएसटी चालानद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेत होती. या टोळीशी संबंधित एका फर्मने १४.३० कोटी रुपयांच्या बोगस बिलांद्वारे २.५७ कोटी रुपयांचा आयटीसी घेतला होता. ही बाब समोर येताच कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली.