रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना युनिट १२ च्या पथकाने अटक केली. या दोघांवरविरुद्ध मुंबईतील पंधरा पोलीस ठाण्यांमध्ये ३५ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरून लुटारू दुचाकीवरून पसार होत असल्याच्या घटना मुंबईत वाढल्या आहेत. गुन्हे शाखा १२ च्या पथकाने याप्रकरणी मुंब्रा आणि पायधुनी येथून दोघांना अटक केली. मुद्दसर खोत (२६) आणि अब्दुल फ्रुटवाला (१९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गेल्या दहा महिन्यांपासून हे दोघे नरिमन पॉईंट ते वाद्रे या परिसरात सोनसाखळी चोरत होते. त्यांच्यावर मुंबईच्या १५ पोलीस ठाण्यात ३५ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. युनिट १२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर दळवी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Story img Loader