राज्यातील शाळा सुरू करताना दोन विद्यार्थ्यांमध्ये दीड मीटरचे अंतर राखणे, दर दोन तासांनी विद्यार्थी हाताळत असलेल्या वस्तू निर्जंतुक करणे असे निकष पाळण्याचे आव्हान राज्यातील शाळांपुढे राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील शाळा जूनपासून सुरू करण्याची तयारी शिक्षण विभाग करत आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्याचे, निकष पाळण्याचे आव्हान शाळांना पेलावे लागणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये दीड मिटर अंतर राखण्यात यावे. विद्यार्थ्यांना शाळेच्या बसऐवजी पालकांनीच शाळेत सोडावे. प्रत्येक शाळेने प्रवेशदारावर विद्यार्थ्यांचे तापमान तपासण्याची सुविधा उपलब्ध करावी. एकाच प्रवेशदारावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. बाहेरच्या कुणालाही शाळेत प्रवेश देण्यात येऊ नये. तापमान अधिक असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात यावे. विद्यार्थी शाळेच्या वेळेत आजारी पडल्यास त्यांच्यासाठी शाळेतच स्वतंत्र खोली असावी. त्याचप्रमाणे संगणक, बटणे, जिन्याचे कठडे, इतर साहित्य अशा मोठय़ा प्रमाणात हाताळल्या जाणाऱ्या गोष्टी दर दोन तासांनी निर्जंतुक करण्यात याव्यात. रोज वर्गाची सुरुवात स्वच्छतेच्या सवयी, काळजी कशी घ्यावी अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यापासून व्हावी. प्रयोगशाळा, ग्रंथालये येथील वावरावर निर्बंध आणावेत. वर्ग सोडून अन्यत्र कोणत्याही ठिकाणी काही उपक्रम घ्यायचा असल्यास तो परिसर उपक्रम घेण्याआधी आणि नंतर निर्जंतुक करण्यात यावा, अशा सूचना भारतीय गुणवत्ता परिषदेने दिल्या आहेत. विविध क्षेत्रातीलतज्ज्ञ, उद्योजक यांचा समावेश असलेली ही शासनाची स्वायत्त सल्लागार संस्था आहे. यापुढील काळात ऑनलाइन व डिजिटल शिक्षणाचे पर्यायसुद्धा मोठय़ा प्रमाणावर परिणामकारकरीत्या उपयोगात आणावेत. त्याचप्रमाणे अभ्यासक्रम कमी करणे, विद्यार्थ्यांना टॅब आणि स्टोरेज कार्ड देण्यात यावे, ऑनलाइन शिक्षणाचे पर्याय सक्षम करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. विभागातील अधिकाऱ्यांबरोबर ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenge of student safety when starting school abn