प्रसाद रावकर
मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून होणाऱ्या वायुगळतीमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अन्य कारणांच्या तुलनेत गॅस सिलिंडर गळतीमुळे लागणाऱ्या आगीच्या दुर्घटनांची संख्या कमी असली तरी मृत आणि जखमींची संख्या मात्र वाढत आहे. परिणामी, अग्निशमन दलासमोर आणखी एक नवे आव्हान उभे राहिले असून जनजागृतीच्या माध्यमातून गॅस सिलिंडरच्या गळतीतून आग लागण्याच्या दुर्घटना टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या सहा वर्षांमध्ये मुंबईत २६ हजार ८५५ आगीच्या दुर्घटना घडल्या. त्यापैकी २० हजार ९ आगीच्या दुर्घटना सदोष विद्युत प्रणालीमुळे घडल्याचा निष्कर्ष दुर्घटनांच्या चौकशी अहवालात नमूद करण्यात आला आहे. तसेच उर्वरित ६८४ आगीच्या दुर्घटना निरनिराळय़ा कारणांमुळे झाल्याचे अहवालात म्हटले आहे. गेल्या सहा वर्षांत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून झालेल्या गळतीमुळे ३३२ घटना घडल्या. या दुर्घटनांमुळे संबंधित कुटुंबालाच नव्हे तर शेजारच्या रहिवाशांनाही धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
सहा वर्षांतील गॅस सिलिंडर गळतीमुळे लागलेल्या आगीच्या दुर्घटनांची संख्या तुलनेत कमी असली तरीही मृत आणि जखमींची संख्या वाढती आहे. गॅस सिलिंडर गळतीमुळे २०१६-१७ या वर्षांमध्ये ६६ ठिकाणी आगी लागल्या होत्या. मात्र २०२१-२२ मध्ये याच कारणामुळे ७३ ठिकाणी आगी लागल्या. त्यात २० पुरुष आणि २२ महिला असे एकूण ४२ जण जखमी झाले, तर ११ पुरुष आणि तीन महिला अशा एकूण १४ जणांना प्राण गमवावे लागले. गेल्या दोन वर्षांपासून गॅस सिलिंडर गळतीमुळे लागणाऱ्या आगीतील मृत आणि जखमींची संख्या वाढू लागली आहे. जनजागृतीद्वारे अशा दुर्घटनांची तीव्रता कमी करण्याचा संकल्प अग्निशमन दलाने सोडला आहे.
गॅस सिलिंडर गळतीमुळे वाढत्या आगीच्या घटनांचे आव्हान
तुलनेत कमी असली तरीही मृत आणि जखमींची संख्या वाढती आहे. गॅस सिलिंडर गळतीमुळे २०१६-१७ या वर्षांमध्ये ६६ ठिकाणी आगी लागल्या होत्या. त्यात दोन पुरुष आणि एक महिला असे तिघे जखमी झाले होते. एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. मात्र २०२१-२२ मध्ये याच कारणामुळे ७३ ठिकाणी आगी लागल्या. त्यात २० पुरुष आणि २२ महिला असे एकूण ४२ जण जखमी झाले, तर ११ पुरुष आणि तीन महिला अशा एकूण १४ जणांना प्राण गमवावे लागले. गेल्या दोन वर्षांपासून गॅस सिलिंडर गळतीमुळे लागणाऱ्या आगीतील मृत आणि जखमींची संख्या वाढू लागली आहे. ही चिंतेची बाब असून जनजागृतीच्या माध्यमातून अशा दुर्घटनांची तीव्रता कमी करण्याचा संकल्प अग्निशमन दलाने सोडला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा